रत्नागिरी, फेब्रुवारी : रत्नागिरी जिल्हा पुरुष कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी सचिन कामेरकर यांची निवड करण्यात आली.
ठाणे येथे बाविसाव्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा होत आहेत. तेथील रत्नागिरी जिल्हा पुरुष कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सचिन कामेरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कामेरकर सध्या संगमेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. देवरूखचे सुपुत्र असलेले कामेरकर सोळजाई कबड्डी संघाकडून खेळले आहेत.
