cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता', भारताचा ६ गडी राखून पराभव
Sports

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता', भारताचा ६ गडी राखून पराभव

CliQ INDIA
Last updated: November 20, 2023 3:00 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
सामना

* भारताचे तिसऱ्यांदा भंगले स्वप्न

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर (हिं.स.) : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. मात्र भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. सामना संपताना पाणावलेले डोळे आणि हताश चेहरे, असे काहीसे स्टेडियमवर पहायला मिळाले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या ११व्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

विश्वचषकाच्या अंतिम महामुकाबल्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावत २४१ धावा करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलिया संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १४१ धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८, मिचेल मार्शने १५ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर सात, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.

रोहितने यावेळी मास्टरप्लॅन अमलात आणला. मोहम्मद शमीला सुरूवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आणले आणि शमीने ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत दोन गडी बाद केले. पण ऑस्ट्रेलियाने धावगती (रन रेट) खाली पडू दिला नाही. रोहितने फिरती गोलंदाजांना उतरवले आणि ऑस्ट्रेलियाने लय पकडली. ट्रॅव्हिस हेडने झंझावती शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याने १२० चेंडूत १३७ धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने चार षटकार आणि १५ चौकार मारले. दरम्यान ४७ धावांवर तिसरा गडी बाद झाल्यानंतर लाबुशेन याने संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. लाबुशेनने ११० चेंडूमध्ये नाबाद ५८ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.

ट्रॅव्हिस हेड आणि लाबुशेन या जोडीपुढे एकाही भारतीय गोलंदाजाची डाळ शिजली नाही. शमी आणि बुमराह यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संधीच दिली नाही. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा ही फिरकी जोडीलाही गडी बाद करण्यात यश आले नाही. जाडेजाने १० षटकांत ४३ धावा खर्च केल्या. तर कुलदीप यादव याने १० षटकांत ५६ धावा दिल्या. या दोघांनाही गडी बाद करण्यात अपयश आले. बुमराहने दोन, शमीला एक आणि सिराजला एक गडी बाद करता आला.

ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वांत यशस्वी संघ

या अगोदर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाने २००३ मध्ये भारताचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने याआधी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वांत यशस्वी संघ ठरला आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दापोलीचा गजानन संघर्ष संघ विजेता
ओलंपिक खेळ: मेजरी, पर्यावरणीय, आणि आर्थिक पारिश्रमिकांचे द्वार
राज्य शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी विरल मनोज म्हस्केची निवड. | BulletsIn
इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने पुन्हा रोहित शर्मावर दाखवला विश्वास | BulletsIn
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागवले अर्ज

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सामन्यादरम्यान ‘फ्री पॅलेस्टाईन’चा संदेश देण्यासाठी पॅलिस्टिनी समर्थक खेळपट्टीवर
Next Article गोव्यात दिमाखदार सोहळ्याने होणार 54 व्या इफ्फी महोत्सवाची सुरुवात
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?