cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > अखेर मनोज जरांगेंनी आमरण उपोषण घेतले मागे
Regional

अखेर मनोज जरांगेंनी आमरण उपोषण घेतले मागे

CliQ INDIA
Last updated: February 27, 2024 1:45 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

* पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार

* अंबडमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी, इंटरनेट बंद

जालना, फेब्रुवारी  : मराठा आरक्षण आणि सगे-सोयरे यांच्या नावासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा, असे आवाहन समाज बांधवांना केले आहे. दरम्यान रुग्णालयात दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मनोज जरांगे यांनी काल (रविवारी) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत वाद निर्माण केला. मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. फडणवीसांना मला मारायचं आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी मला मारुन दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते. त्यानंतर विविध स्तरातून त्यांनी फडणवीसांच्या केलेल्या अपमानाचा निषेध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर येत अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाही. यासाठी त्यांनी आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार असल्याचे . यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केले. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

अंबडमध्ये रविवारी रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. त्यानंतर सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. अखेर जरांगे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते. जरांगे यांनी १० फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस होता. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. येत्या काळात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

कार-बुलेट अपघातात शिक्षकाचा मृत्यू
अहिल्यानगर : सहाय्यक लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी | BulletsIn
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात
प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या – पुणे आयुक्त
मार्तंड देवसंस्थानविरोधात जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा आक्रमक | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पंतप्रधान 27-28 फेब्रुवारी केरळ तामिळनाडू, महाराष्ट्र दौऱ्यावर
Next Article रत्नागिरी जिल्हा पुरुष कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी सचिन कामेरकर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?