नाशिक, १६ डिसेंबर, (हिं.स.) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा समारोप संपन्न झाला. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक यांनी मैदानावर उपस्थीत राहून अंतिम कबड्डी संघाची ओळख करून घेतली. तसेच त्यांच्या हस्ते नाणेफक करून सामना सूरू करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी कबड्डी सामना बघण्याचा आनंद लुटला. तसेच खेळाडूंसोबत संवाद साधला.
बक्षीस वितरण कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाला.
आपले विचार व्यक्त करतांना कुलगुरूंनी सांगितले की, खेळाडूंसाठी जे काही चांगले करायचे असेल त्यासाठी विद्यापीठ मागेपुढे पाहणार नाही. विद्यापीठ खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी सतत तयार राहील. सर्वसाधारण विजेतेपद नाशिक विभागीय केंद्रास मिळाले
कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी केले. सुत्रसंचालन सुनिल साळुंके यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेतून निवड झालेला विद्यापीठाचा संघ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे 12 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड येथे 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी होईल.
प्रमुख पंच म्हणून एस. एन. काळे, संदीप फोगट, गौरी राजोळे, राम कुमावत, दिपक लभडे, राहुल आव्हाड, श्रेया चिटणीस आणि तांत्रिक समितीमध्ये डॉ. बाजीराव पेखळे, प्रा. डी. एम. आहेर, प्रा. सुनिल जाधव, प्रा. सुनिल धोंडगे यांनी काम बघितले.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे –लांबउडी – मुले – प्रथम – श्रीकांत चिंगडे (पुणे), द्वितीय – करण मोरे (मुंबई), तृतीय – ओंकार शिंदे (पुणे). मुली – प्रथम – सिम्पल चव्हाण (अमरावती), द्वितीय – रामेश्वरी वालथरे(नागूपर), तृतीय – अनुराधा सुतार (कोल्हापूर). भालाफेक – मुले – प्रथम – संदिप बोलिजा (नाशिक), द्वितीय – पार्थ सावरकर (अमरावती), तृतीय – करण मोरे (मुंबई). मुली – प्रथम – अपेक्षा ठाकरे (अमरावती), द्वितीय – पुणम पारतेली (नागूपर), तृतीय – पल्लवी शेळके (नाशिक). गोळाफेक – मुले- प्रथम – विशाल बाबर (नाशिक), द्वितीय – अमोल पवार (पुणे), तृतीय – सुजीतकुमार साजणे (कोल्हापूर). मुली – प्रथम – शिवाणी महाडीक (कोल्हापूर), द्वितीय – पल्लवी शेळके (नाशिक), तृतीय – ऋतुजा बनकर (पुणे). 1500 मिटर धावणे – मुले- प्रथम – वैभव सावंत (अमरावती), द्वितीय – धनाजी यादव (कोल्हापूर), तृतीय – ऋषीकेश चव्हाण (नांदेड). मुली – प्रथम – काजल गावंडे (पुणे), द्वितीय – सोनाली मुनेश्वर (नांदेड), तृतीय – कोमल घोगडे (कोल्हापूर).
400 मिटर धावणे – मुले- प्रथम – आकाश वागुले (कोल्हापूर), द्वितीय – सोहेल खान (नांदेड), तृतीय – मयुर पवार (नांदेड). मुली – प्रथम – काजल गावंडे (पुणे), द्वितीय – अनिता पाडवी (नाशिक), तृतीय – पुनम खांडरी (अमरावती). 100 मिटर धावणे – मुले- प्रथम – यशवंत गुंजाळ (नाशिक), द्वितीय – विक्रम शिरसागर (पुणे), तृतीय – तेजस पाल (नाशिक). मुली – प्रथम – शिंपत चौहान (अमरावती), द्वितीय – अनिता पाडवी (नाशिक), तृतीय – ममता नरवडे (नांदेड). 800 मिटर धावणे – मुले- प्रथम – तुषार सुर्यवंशी (नाशिक), द्वितीय – आकाश कलाप्पा (कोल्हापूर), तृतीय – दर्शन ठाकूर (मुंबई). मुली – प्रथम – साक्षी जाधव (कोल्हापूर), द्वितीय – भाग्यश्री काळे (पुणे), तृतीय – खुशी हातकर (अमरावती). 200 मिटर धावणे – मुले- प्रथम – यशवंत गुंजाळ (नाशिक), द्वितीय – दिपक शिंदे (पुणे), तृतीय – हर्षवर्धन भालेकर (पुणे). मुली – प्रथम – सिंम्पल चव्हाण (अमरावती), द्वितीय – सगुणा देसाई (नांदेड), तृतीय – साक्षी जाधव (कोल्हापूर). उंच उडी – मुले- प्रथम – सुरज तिवारी (मुंबई), द्वितीय – वैभव देवरे (नाशिक), तृतीय – ओम काळे (अमरावती). मुली – प्रथम – पुजा भोसले (पुणे). थाळी फेक – मुले- प्रथम – तेजस हाके (पुणे), द्वितीय – पार्थ सावरकर (अमरावती), तृतीय – विशाल बाबर (पुणे).
5000 मिटर धावणे – मुले- प्रथम – कुमारसिंग ठाकरे (नाशिक), द्वितीय – धनाजी वालवे (कोल्हापूर), तृतीय – विठ्ठल राठोड (नांदेड). मुली – प्रथम – ऋतुजा बनकर (पुणे), द्वितीय – कोमल घोडे (कोल्हापूर), तृतीय – खुशी हातकर (अमरावती). तिहेरी उडी – मुले- प्रथम – नितीन दोरखिडे (नागपूर), द्वितीय – श्रीकांत चिघले (पुणे), तृतीय – प्रज्वल माहूरे (अमरावती). कबड्डी – कोल्हापूर (विजेता), नाशिक (उपविजेता). खो-खो – छत्रपती संभाजी नगर (विजेता) अमरावती (उपविजेता). व्हॉलीबॉल – नागपूर (विजेता) नाशिक (उपविजेता). बॅडमिंटन – प्रथम – अनिकेत इंगोले (छ. संभाजी नगर), द्वितीय – मोहन पाटील (नाशिक), तृतीय – सान्निध्य पगारे (छ. संभाजी नगर). बुद्धीबळ – प्रथम – विक्रम गावडे (कोल्हापूर), द्वितीय – उत्तम लिंबाचीया (मुंबई), तृतीय – चंद्रशेखर बाबरे (नांदेड).
हिंदुस्थान समाचार
