नाशिक, २६ जानेवारी : दिव्यांगांना मदत आणि कृत्रिम अवयव रोपण यासाठी जनजागृती करणारे जर्मनीचे स्टिफन वृर्मान भारत भेटीवर आहेत. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नाशिक सायकलिस्टस फॉउंडेशनच्या वतीने त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
ज्या व्यक्तींना हात, पाय नसल्याने दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यायना जर कुत्रिम अवयव रोपण केल्यास ते स्वतःची कामे पुन्हा करू शकतात. याबाबत जनजागृती करण्यासाठी जर्मन येथील स्टिफन वृर्मान स्वतः अपघात होऊन नंतर अर्धांगवायू झाल्याने चालता येत नसल्याने विशिष्ट पद्धतीच्या सायकलवर झोपून सातारा येथून मुबंईपर्यंत प्रवास करीत आहे. सातारा येथून निघाल्यानंतर नारायणगावला मुक्काम करून सकाळी ते नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आले असता नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉ. मनीषा रैदळ, एस.पी. आहेर, विनायक वरुंगसे, मयूर कुलकर्णी, रवींद्र भेला आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करून मदत केली
