नवी दिल्ली, 26 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि हुतात्म्यांना अभिवादन केले. ज्यांनी आपल्या देशाचे निःस्वार्थ भावनेने रक्षण केले त्यांचे आपण स्मरण करत आहोत आणि त्यांचा सन्मान करत आहोत, असे ते म्हणाले.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर जारी केलेल्या संदेशात म्हंटले आहे की, राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. ज्यांनी आपल्या देशाचे निःस्वार्थ भावनेने रक्षण केले त्यांचे आपण स्मरण करत आहोत आणि त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांचे साहस आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी ज्या सिद्धांतांचा पुरस्कार केला त्यांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा करत, आदर आणि कृतज्ञतेने त्यांना वंदन करत आहोत असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.
