महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी (e-Samriddhi) ई समृध्दी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी नोंदणी करून खरेदी करता येईल. सर्व शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#login या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी व केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.
BulletsIn
- मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबीन खरेदी: हंगाम 2024-25 मध्ये राज्यात या पिकांची खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार आहे.
- आधारभूत दर: केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार शेतमालाची खरेदी होईल.
- ई समृध्दी पोर्टल: शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी (e-Samriddhi) ई समृध्दी पोर्टल सुरू केले आहे.
- नोंदणी प्रक्रिया: शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#login या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी.
- योग्य दर: पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे शेतमालाला योग्य दर मिळेल.
- सरकारी योजना: नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
- सर्व शेतकऱ्यांचा सहभाग: राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी.
- नावनोंदणीची अडचण: नोंदणीच्या अडचणीबाबत संपर्क साधावा.
- संपर्क क्रमांक: जिल्हा पणन अधिकारी चंद्रपूर – 8828501090, प्रतिनिधी श्रीकांत चिद्रेवार – 9096030742.
- जिल्हा मार्केटिंग अधिकारी: व्ही.एस. तिवाडे यांनी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन केले आहे.
