अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग. आपल्या वैविध्यपूर्ण अभिनय आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा पुष्कर यंदा अनेक नवीन प्रोजेक्ट्ससह चर्चेत आहे.
BulletsIn
- पुष्कर जोग अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळखला जातो.
- नात्यांसारख्या संवेदनशील विषयांवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
- ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रीकरण झाले होते.
- ‘कोक’ या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार आहे.
- ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिलाच मराठी चित्रपट पुष्करने बनवला आहे.
- ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ चित्रपटात पुष्करने अभिनयासह दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे.
- पुष्करने नवीन चित्रपट ‘टॅबू’ची घोषणा केली आहे.
- ‘टॅबू’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेख जोग करणार आहे.
- ‘टॅबू’ चित्रपट ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रीत होणार आहे.
- ‘टॅबू’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला आहे.
- पुष्करचे म्हणणे आहे की, ‘टॅबू’च्या माध्यमातून काहीतरी नवीन घेऊन येत आहे आणि लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
