नाशिक, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : वायुसेना स्टेशन ओझरचा कमान पदभार 31 ऑक्टोबर 2023 रोजी एयर कमोडोर आशुतोष वैद्य यांनी एयर कमोडोर राकेश कुमार खजांची विशिष्ट सेवा मेडल यांचे हस्ते स्वीकारला.
एयर कमोडोर आशुतोष वैद्य यांनी भारतीय वायुसेना मध्ये एरॉनॉटीकल इंजिनियरिंग शाखा मध्ये दिनांक 30 सप्टेंबर 1991 मध्ये कमिशन (कार्याधिकार) प्राप्त केले आहे. आई आई टी मुंबई येथुन त्यांनी मेटॅलेर्जिकल इंजिनियरिंग तथा मटेरियल सायन्स मध्ये एम टेक ची पदविका प्राप्त केली तसेच अग्रिम पंक्तिचे बहुविध लडाकु वायुयानाचे प्रशिक्षण प्राप्त केले आहे.त्यांनी यू एस ए मधिल प्रतिष्ठित फ्लाइट / जेट इंजन दुर्घटना प्रशिक्षण सफलता पूर्वक प्राप्त केले. विभिन्न फ्लाइंग स्टेशनांमध्ये, ऑपरेशनल स्कवाडन मध्ये तसेच बेस रिपेअर डिपो मध्येही त्यांनी आपली सक्रिय सेवा पूर्ण क्षमते ने दिली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी तीन दशकाहुन अधिक काळ त्यांनी विभिन्न महत्वपूर्ण पद विभूषित केले आहे जसे कि तकनीकी प्रशिक्षण विद्यालय मध्ये कमांडिंग ऑफिसर तसेच वायुसेना मुख्यालय मध्ये स्टाफ नियुक्ती. वायु अफसर कमांडिंग-इन-चीफ द्वारा वर्ष 2002 व वायुसेना अध्यक्ष द्वारा वर्ष 2004 मध्ये एयर कमोडोर आशुतोष वैद्य यांना आपली पूर्ण निष्ठा, कठिन परिश्रम व व्यावसायिक कार्यकुशलता करिता प्रशंसा प्राप्त केली आहे.
हिंदुस्थान समाचार
