आज, सोमवारी विदर्भात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथे दोन जण आणि भंडारा जिल्ह्यात तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनांमुळे चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
BulletsIn
- नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथे वीज कोसळून प्रभाकर रेवतकर आणि हिराबाई रेवतकर या दाम्पत्याचा मृत्यू.
- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे शेतात काम करत असलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली.
- मोहाडी येथे आशा सुरेश सोनटक्के आणि कला तुकाजी गोखले या दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू.
- मोहाडी येथील चार महिला गंभीर जखमी: रुखमा निमजे, मैना सेलोकर, वंदना जिभकाटे, निशा जिभकाटे.
- जखमी महिलांवर मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात चिचटोला येथे यादवराव बाळाजी दिघोरे यांचा वीज कोसळून मृत्यू.
- नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यामधील मोहपा गावात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू.
- विदर्भातील नागपूरसह अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी पावसाने हजेरी लावली.
- अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले, जोरदार मेघगर्जनेसह पाऊस.
- पावसामुळे परिसर जलमय झाला असून सिंचन प्रकल्पातीन पाण्याच्या पातळीत वाढ नोंदवल्या गेली आहे.
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
