cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > 'सखोल स्वच्छता मोहीम' देणार नवी मुंबईच्या स्वच्छतेला नवा आयाम
Regional

'सखोल स्वच्छता मोहीम' देणार नवी मुंबईच्या स्वच्छतेला नवा आयाम

CliQ INDIA
Last updated: January 19, 2024 3:30 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

नवी मुंबई, 19 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे इतरही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबविण्यास सुरुवात होत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वेब प्रणालीव्दारे थेट संवाद साधत याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

यामध्ये आयुक्तांनी मुख्यमंत्री महोदयांची या मोहीमेमागील भूमिका स्पष्ट करत नवी मुंबईसारख्या राज्यातील स्वच्छतेत सर्वात अग्रणी असलेल्या शहराबद्दल त्यांच्या मनात निश्चितच अधिक अपेक्षा असतील असे सांगत त्यादृष्टीने आपण अधिक जोमाने व प्रभावीपणे ही मोहीम राबवायला हवी व झोकून देऊन काम करायला हवे असे सूचित केले.आपल्या शहरात नियमीतपणे चांगल्या प्रकारे स्वच्छता होत असते. मात्र कोणत्याही गोष्टीत अधिक सुधारणेला वाव असतोच. त्यानुसार स्वच्छता ही अधिक उत्तम रितीने होण्याकडे अधिक बारकाईने लक्ष दयावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. यामध्ये मुख्य रस्त्यांची स्वच्छता यांत्रिकी वाहनांव्दारे करणे, रस्ते स्वच्छतेमध्ये मलप्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर करणे, रस्त्यांप्रमाणेच पदपथ स्वच्छ करणे अशा विविध बाबींकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेप्रमाणेच अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेवरही बारकाईने लक्ष देऊन स्वच्छ करण्याचे त्यांनी निर्देशित केले. रस्ते, पदपथ स्वच्छता म्हणजे केवळ कचरा नसणे इतकेच नसून त्यासोबतच रस्त्याकडेच्या जागा, मधल्या दुभाजकांमधील जागा यांचे सुशोभिकरण, कर्बस्टोनची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त पदपथ याकडेही लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

रस्त्यांप्रमाणेच बाग-बगीचे, मैदाने, चौक, बाजारपेठा अशा सार्वजनिक ठिकाणांचीही स्वच्छता मनाला प्रसन्नता आणते त्याचप्रमाणे शहर सुशोभिकरणाच्या विविध गोष्टींनीही शहराची प्रतिमा बदलते त्यादृष्टीनेही स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील सखोल स्वच्छता मोहीम अत्यंत उपयोगी असल्याने तिचा प्रभावी उपयोग शहराचे स्वच्छता मानांकन उंचावण्यासाठी होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. कोणत्याही सामाजिक उपक्रमात व त्यातही तो स्वच्छता विषयक असेल तर अधिक मोठया प्रमाणात नागरिकांचा, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळतो हे नवी मुंबईचे वैशिष्टय असून त्यादृष्टीने याही मोहिमेत लोकसहभागावर भर दयावा असे त्यांनी संबंधित विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांना सूचित केले.

या सखोल स्वच्छता मोहीमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत सिडको, एमआयडीसी, एपीएमसी, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, रेल्वे, पोलीस, प्रादेशिक वाहतूक विभाग अशा विविध प्राधिकरणांनीही आपापल्या क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडून सहभागी व्हावे याकरीता त्यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.या मोहीमेची जनजागृती करण्यासाठी जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.त्याचप्रमाणे नमुंमपा क्षेत्रातील मंदीरांसह विविध प्रार्थना स्थळांची अंतर्गत व बाहय परिसर स्वच्छता हाती घेण्याबाबतही आयुक्तांमार्फत विशेष निर्देश देण्यात आले असून 21 व 22 जानेवारी रोजी मंदिरांवर विदयुत रोषणाई मंदीर व्यवस्थापनांकडून करवून घेणेबाबतच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

याशिवाय 1 जानेवारी पासून ‘माझी शाळा-सुंदर शाळा’ हा विशेष स्वच्छता उपक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार सर्वत्र राबविला जात असून यामध्ये शिक्षण विभागामार्फत कार्यवाही होत असली तरी त्यामध्ये परिमंडळ व संबंधित विभाग कार्यालय, अभियांत्रिकी, घनकचरा व्यवस्थापन, उदयान या विभागांनीही लक्ष दयावे असे यावेळी आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Campaign) ही शहराचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात, पर्यावरण संरक्षण व संवर्धनात तसेच प्रदूषणाला आळा बसण्यात व शहर टापटीप, स्वच्छ व सुंदर दिसण्यात लाभदायी असल्याने सर्व संबंधित विभागप्रमुखांनी व विभाग अधिकाऱ्यांनी तसेच क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांनी ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सींगमध्ये आयुक्त् महोदयांसमवेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त् तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरिष आरदवाड आणि कार्यकारी अभियंता हे अधिकारी प्रत्यक्ष तसेच सर्व विभाग अधिकारी व काही कार्यकारी अभियंता वेबसंवादाव्दारे उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नाशकात प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाचे जोरदार निषेध आंदोलन
दापोलीत रवींद्र चव्हाणांनी केले भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
भंडारा : आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने मोर्चा | BulletsIn
जळगाव जिल्ह्यात ७२ वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन होणे अभिमानाची बाब – जिल्हाधिकारी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article 'डिलिव्हरी बॉय' चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
Next Article विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये एकूण रुग्णसंख्येने ओलांडला 5 कोटींचा टप्पा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?