डोंबिवली, १२ जानेवारी, (हिं.स) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात राबवलेल्या जनहिताच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. तसेच जनसेवेच्या कार्यात सुसूत्रता राहावी यासाठी जनसंपर्क कार्यालय असणे गरजेचे म्हणून प्रत्येक तालुका-तालुका भाजपाची जनसंपर्क कार्यालये होत आहेत. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात भाजपने जनसंपर्क कार्यालय केले. त्या कार्यालयाचे उदघाटन कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपा जनसंपर्क कार्यालय माध्यमातून जनसेवेच्या कार्यात सुसूत्रता राखली जाणार आहे. मंत्री चव्हाण हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर असताना शुक्रवारी दापोली नाका येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने बांधण्यात आलेल्या दापोली तालुका कार्यालयाचे उद् घाटन त्यांनी केले. जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी, जनतेला हव्या असणाऱ्या सोयी सुविधा उभारण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरणार आहे असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.
सदर उदघाटनप्रसंगी प्रदेश माजी आमदार विनय नातू, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रत्नागिरी उत्तर भाजापाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
