नाशिक, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाची बुलंद तोफ श्रध्देय प्रमोद महाजन यांचे नाशिकशी घनिष्ठ ऋणानुबंध होते. त्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने नाशकातच फुलले. त्यांनी कार्यकर्ते घडविले. कार्यकत्यांचा ते सन्मान बाळगत. वक्तशिरपणा व टापटिपपणा हे त्याचे गुण सर्वानी आत्मसात करावे असेच होते. जनतेची सेवा करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले.
प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम वसंतस्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, रोहिणी नायडू, पवन भगुरकर, मध्य मंडल अध्यक्ष वसंत उशीर यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा देत त्याचा जीवनप्रवास उलगडून दाखवला. तसेच सुजाता करजगीकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार
