राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.
BulletsIn
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजपचे जोरदार आंदोलन.
- भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वरती कारवाई करण्याची मागणी केली.
- नाशिक शहर जिल्ह्यातील सीबीएस शालिमार रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन.
- आंदोलनात भाजपचे महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे महानगर अध्यक्ष राकेश दोंदे आणि इतर प्रमुख उपस्थित.
- आमदार देवयानी फरांदे, राहुल आहेर, राहुल ढिकले, सिमा हिरे आणि इतर नेतेही आंदोलनात सहभागी.
- जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले होते.
- या आंदोलनात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोप.
- कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते स्वताच्या मस्तीत होते.
- बाबासाहेबांच्या फोटोचे तुकडे केल्यामुळे भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला.
- भाजपचे नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी या आंदोलनाची माहिती दिली.
