अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : हरिसाल मेळघाटातील हरिसाल व धारणी परिसरातील अतिदुर्गम भागात वीज वितरणाकडून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धारणीतील महावितरणाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी वारंवार वीज वीतरणाकडे आपलो समस्या घेऊन जात आहे. परंतु त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे निवडणुकी अनेक आश्वासन देणारे व प्रलोभन देणारी नेते मंडळीनी सद्धा शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. ऐन रब्बी गहू व चना पेरणोचा वेळेस शेतातील जमीन सिंचन करून पेरणी करायची असते. परंतु, आता कमी विद्युत वीज पुरवठा होत असल्याने ते शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याप्त अतिवृष्टीमुळे पीके जमीनदोस्त झाली. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी बांधवाला दुहेरी संकटात पडलेले आहे. अशातच कर्ज बाजारी झालेल्या शेतकरींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचे विचार येण्याची शक्यता आहे. आता फक्त एक उपाय म्हणजे डिझल इंजिनने शेतीला सिंचन करून पेरणी करू शकतो, परंतु डिझलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे सिंचन आता मात्र विजेचा मोटर पंपने एक मात्र उपाय राहिलेला आहे. अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतातील मीटर मागणीसाठी आनलाइन अर्ज केलेला आहे. परंतु वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आजपर्यंत शेतात खांब लावून मीटर देण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात चोरीची वीज आकोड़ा विजेचा तारेवर लावून सिंचन करण्यास भाग पडत दिसून येत आहे. चोरून वीजपुरवठा घेणाऱ्यांचा फटका घरगुती वीज व दुकानात वीज पावरत असलेले लोकांवर पडत आहे. त्यांना जास्त वीज बिले दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, शासन प्रशासन व अधिकारी जवाबदार राहतील काय ? अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू दिसून येत आहे.
हिंदुस्थान समाचार
