नाशिक, १७ नोव्हेंबर, (हिं.स.) : युतीने लग्नात नकार दिल्यानंतर गाड्या जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या काठी गल्ली येथील एका तरुणीची झालेल्या ओळखीतून तयार झालेले प्रेम संबंधात या मुलीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर येथील संशयित प्रियकराने सोसायटीच्या आवारात असलेल्या तरुणीच्या गाडीसह अन्य सात गाड्या जाळण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कठाळा भागात राहणाऱ्या सुमित पगारे व त्याचा मित्र विकी जावरे या दोघांना अटक केली आहे.
हिंदुस्थान समाचार
