मुंबई, 13 ऑक्टोबर : ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या ५.०० मीटर रुंद पादचारी पूल (CSMT टोकाला) साठी चार गर्डर लाँच करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. ज्यात डाऊन धिम्या मार्गाचा (स्पॅन-2) समावेश आहे. एकूण स्पॅन्स – 7 पूर्ण झालेले स्पॅन – 5 हा प्रस्तावित ब्लॉक सहाव्या स्पॅनसाठी असेल. ब्लॉक खालीलप्रमाणे परीचालीत केला जाईल: ब्लॉकची तारीख: दि. १४/१५.१०.२०२३ (शनिवार/रविवार रात्रीची वेळ) ब्लॉकचा कालावधी: ००.३० वाजल्यापासून – ०५.३० वाजेपर्यंत = ०५.०० तास. वाहतूक ब्लॉक विभाग: डाऊन लोकल मार्ग: मुलुंड ते कळवा यामुळे उपनगरीय ट्रेन धावण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल:
डाऊन धिम्या उपनगरीय सेवांचे डायव्हर्जन: २३.३० ते ०४.१९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऱ्या S 41 ते N 3 डाउन उपनगरीय सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, कळवा आणि मुंब्रा स्थानकावर थांबतील.
ब्लॉकच्या आधी शेवटची लोकल: TL 65 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल आणि टिटवाळ्याला मध्यरात्री ०१.०० वाजता पोहोचेल.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल: CTL 3 विद्याविहार येथून ०५.११ वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे ०६.२३ वाजता पोहोचेल. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
