डोंबिवली, १६ ऑक्टोबर, (हिं.स.) : कोरोना काळात घरातूनच काम (वर्क फॉर्म होम) व घरात शाळा हे मोबाईलद्वारे सुरु होते. त्यानंतर दैनदिन जीवन पूर्वपदावर आल्यावरहि सतत मोबाईलची लागलेली सवय आजही सुटली नाही. याचा थेट परिणाम डोळ्यावर होत असल्याने डोळ्यांचे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यात लहान मुले मोबाईलचा वापर जास्त करत असल्याने या डोळ्याच्या आजार झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याहि माहिती नेत्रचिकित्सक डॉक्टरांनी कल्याण येथील एएसजी नेत्र रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी दिली.
कल्याण पश्चिम येथील खडकपाडा येथील रोक माउंट रेसिडेन्सी येथे नव्याने सुरु झालेल्या एएसजी नेत्र रुग्णालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.नितेश साळुंखे, डॉ. रोहित मेंडके, डॉ. मानस देशमुख आणि डॉ. हरीश पथक उपस्थित होते. या रुग्णालयाचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.तर खासदार डॉ. कपिल पाटील यांच्या हस्ते ऑपरेशन थेटरचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयात एक महिना रुग्णांना एक महिना मोफत ओपीडी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी आ. भोईर म्हणाले, कल्याण शहरात अशा हॉस्पिटलची आवश्यकता होती. सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम असल्याने रुग्णांना उत्तम उपचार याठिकाणी केले जातील.तर अधिक माहिती देताना डॉक्टर्स म्हणाले, या रुग्णालय मोतीबिंदू, लेसीक, विट्रो रेटिना सर्जरी, आक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा, कोर्निया, तिरळेपणा, ऑप्थल्मोलॉजी नेत्ररोगाच्या श्रेणीवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व जटील शास्त्रक्रिया, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. हे रुग्णालय वेळोवेळी मोफत जनजागृती आरोग्य शिबीर आयोजित करणार आहेत. सध्या सर्वच वयोगटातील लोकांचे स्क्रीनटाईमस अधिक असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याकरिता सातत्याने शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटना याठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वर्षातून प्रत्येकाने किमान दोन वेळा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सन 2005 मध्ये डॉक्टर अरुण सिंघवी आणि डॉक्टर शिल्पी गांग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजी आय समूहाची महुर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार झाला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एएसजी समूहाची स्थापना करण्यात आली. एएसजी समूहाचे रुग्णालय संपूर्ण भारतात कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयांची शाखा पूर्व आफ्रिका खंडातील युगांडा मधील कंपाला येथे कार्यरत असून दुसरी शाखा नेपाळ मधील काठमांडू येथे आहे.
हिंदुस्थान समाचार
