मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.) मध्य रेल्वे मुंबई-थिवि, पुणे/पनवेल-करमाळी आणि पुणे अजनी दरम्यान ३६ विशेष गाड्या चालवणार आहे.
१. मुंबई-थिवि-मुंबई विशेष (दैनिक) – २४ सेवा दैनिक विशेष
०११५१ दि. २२.१२.२०२३ ते दि. ०२.०१.२०२४ (१२ फेऱ्या) दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ००.२० वाजता सुटेल आणि थिवि येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११५२ थिवि येथून दि. २२.१२.२०२३ ते दि. ०२.०१.२०२४ (१२ फेऱ्या) १५.०० वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे.
संरचना: २२ डब्बे जसे की: एक वातानुकूलित द्वितीय, तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.
२. पुणे-करमळी-पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)
०१४४५ स्पेशल दि. २१.१२.२०२३ आणि दि. २९.१२.२०२३ (२ फेऱ्या) रोजी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल.
०१४४६ विशेष गाडी दि. २४.१२.२०२३ आणि दि. ३१.१२.२०२३ रोजी करमळी येथून ०९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३५ वाजता पोहोचेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना: २२ डब्बे जसे की: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित , ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
३. पनवेल-करमळी-पनवेल-विशेष (साप्ताहिक) – ४ सेवा
०१४४७ स्पेशल दि. २३.१२.२०२३ आणि पनवेल येथे दि. ३०.१२.२०२३ (२ फेऱ्या) रोजी २२.०० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल.
०१४४८ विशेष गाडी दि. २३.१२.२०२३ आणि करमळी येथून दि. ३०.१२.२०२३ रोजी ०९.२० वाजता निघेल (२ फेऱ्या) आणि पनवेल येथे त्याच दिवशी २०.१५ वाजता पोहोचेल.
थांबे: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना: २२ डब्बे जसे की: एक द्वितीय वातानुकूलित, ४ वातानुकूलित तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी.
४. पुणे-अजनी-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक विशेष (४ सेवा)
०१४६५ सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल पुणे दि. २६.१२.२०२३ आणि दि. ०२.०१.२०२४ (२ फेऱ्या) रोजी १५.१५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
०१४६६ सुपरफास्ट विशेष अजनी येथून दि. २७.१२.२०२३ आणि दि. ०३.०१.२०२४ (२ फेऱ्या) रोजी १९.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड दोरमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: २२ डब्बे जसे की: तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित आणि २ जनरेटर व्हॅन.
आरक्षण: विशेष ट्रेन क्र.०११५१/०११५२, ०१४४५/०१४४६, ०१४४७/०१४४८ आणि ०१४६५/०१४६६ साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. २१.११.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctco.inct.co संकेतस्थळावर सुरू होईल.
हिंदुस्थान समाचार
