मुंबई, 19 जून (हिं.स.) मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात संध्या पाठक या तरुणीने
आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात
साठ्ये महाविद्यालय आहे.
गुरुवारी सकाळी या मुलीने साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संध्या
पाठक साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. आज सकाळी संध्याचा मृतदेह
आढळून आला. महाविद्यालय प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयांना ती तिसऱ्या मजल्यावरुन
पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे सांगितले. मात्र, संध्या पाठकने आत्महत्येचे
टोकाचे पाऊल का उचलले याचा
तपास सध्या विलेपार्ले पोलिसांनी सुरु केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी
महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. संध्या पाठक ही
तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच
तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या कुटुंबीयांनी
ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याचे सांगितले. मात्र, संध्याच्या
कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. तिला कोणीतरी ढकलेले असल्याचं संध्याच्या
कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
