पुणे, 10 मार्च (हिं.स.)पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि अग्रीस्टॅक योजनेत नावनोंदणी न केलेले सुमारे 61 हजार शेतकरी आहेत. ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून, पीएम किसान योजनेच्या निकषांत बसत नसल्यास त्यांचा लाभ बंद करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. ही पडताळणी करण्यास महसूल, तसेच कृषी विभागाला सांगण्यात आले आहे.
डुडी यांनी याबाबत नुकतीच आढवा बैठक घेतली. त्यात हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला अग्रीस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी याची अद्याप नोंदणी केलेली नाही. तसेच, या शेतकरी ओळख क्रमांकाची संलग्लता कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी केली आहे. हा क्रमांक असल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच पीएम किसान योजनेत सहभागी असलेले आणि ॲग््राीस्टॅक योजनेत नाव नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांविषयी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
