
चंद्रपूर 29 डिसेंबर (हिं.स.) : गोंडवाना विद्यापीठात आयोजित आंतरमहाविद्यालयीन आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दरम्यान विजयी चमू १२ ते १५ जानेवारीला नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अविष्कार २०२३’ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात नुकतेच आंतर महाविद्यालयीन अविष्कार उत्सव २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात पहिल्या दिवशी येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या १७ चमूंनी भाग घेतला होता. त्यात ११ चमूंना विजयी घोषित करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी १० चमूंनी सहभाग घेतला होता. त्यात ९ चमूंना विजयी घोषित करण्यात आले. ह्या ९ चमू १२ ते १५ जानेवारीला नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अविष्कार २०२३’ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
श्वेता गुंडावार, श्रीकांत साव, लीना रहांडले, आदित्य बाळचन्ने, कौस्तुभ खंडाईत, रीमा गौतम, देवेंद्र गोंडे, साक्षी गोंनाडे, करुणा खोब्रागडे हे सर्व विजयी चमूतील सदस्य आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ..पी. एम. काटकर यांनी दिलेल्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे, तर अविष्कार समन्वयक डॉ. शरयू पोतनूरवार, मार्गदर्शक वर्ग डॉ. एस.बी. किशोर, डॉ. सपना वेगीनवार, डॉ. राहुल कांबळे, डॉ. दिलीप वाहने. डॉ. प्रकाश बोरकर, डॉ. कन्नाके यांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याची भावना विजयी चमूतील सदस्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुधाकर पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
