मुंबई, 4 जानेवारी (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 2023 च्या वाणिज्यिक महसूलामध्ये प्रभावी कामगिरी दर्शवली आहे. 2023 साठी एकूण वाणिज्यिक उत्पन्न रु.7121.60 कोटी इतकी प्रभावी झाले. वर्ष 2022 मधील रु. 6066.69 कोटीच्या तुलनेत ही 17.39% ची उल्लेखनीय वाढ आहे. 2022 मधील रु.3418.43 कोटीच्या तुलनेत 2023 मध्ये रु.4017.23 कोटींसह कोचिंग आणि प्रवासी उत्पन्नाचा मोठा वाटा आहे जो 17.52 % वाढला आहे.
इतर कोचिंग उत्पन्न जसे की, पार्सल आणि लगेज आणि तिकीट तपासणी यामधून मिळणारे उत्पन्न 2023 मध्ये रु.445.50 कोटी झाले, 2022 मधील रु.401.95 कोटीच्या तुलनेत 10.83% ची वाढ दर्शवते.
प्रवाशांच्या संख्येत 13.19% वाढ झाली आहे, म्हणजे 2023 मधील 142.60 कोटी प्रवाशांवरून 2022 मध्ये 125.99 कोटी प्रवासी झाले.
वर्ष 2022 मधील रु. 2157.65 च्या तुलनेत 2023 मध्ये रु.2533.92 कोटींसह गुड्स पासून मिळणारी उत्पन्न देखील प्रभावी आहे जे 17.44% ने वाढली आहे.
रेल्वे आणि रेल्वे परिसरांवरील जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न 2023 मध्ये रु. 124.95 कोटी होते, जे 2022 मध्ये रु. 88.65 कोटीच्या तुलनेत 40.95% वाढले आहे.
महसुलात वाढ होण्याचे श्रेय मुंबई विभागाने प्रवासी आणि माल वाहतुकीच्या सखोल मार्केटिंगसाठी उत्पन्नाला चालना देण्यासाठी आणि चांगल्या आणि आरामदायी प्रवासासाठी वाढीव प्रवासी सुविधा देण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे आहे.
हिंदुस्थान समाचार
