नांदेड, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून तापमानात सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस बघायला मिळाला तर आता अनेक ठिकाणी गारठा वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ऐन नोव्हेंबरमध्ये काही भागात प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने सकाळी व रात्रीच्या वेळीस शेकोटी पेटत असून घरातील उबदार कपड्यांची गरज नागरिकांना जाणवत आहे.
आधीच कमी तापमान नोंदवले गेले असताना तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना प्रदूषणाची पातळीही वाढत असल्याचं दिसत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
