सोलापूर 14 डिसेंबर ( हिं.स)
पंढरपूर नगरपालिकेने प्रस्तावित मालमत्ता करवाढ रद्द करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.पंढरपूर नगरपरिषदेने मालमत्ता करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात मनसे व विठ्ठल परिवाराच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर मनसे नेते धोत्रे यांनी नागपूर येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला करवाढ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती श्री. धोत्रे यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
