भंडारा ३० डिसेंबर(हिं.स.) – मजुरीने हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाश्यांनी हल्ला चढिवला. त्यात ३ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना भागडी शेतशिवारात घडली. तृप्ती धनराज देशमुख (३०), वच्छला बापू कुरंजेकर (६५) व सुनीता केवळराम देशमुख (५५ तिन्ही रा. भागडी) असे मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी मिहला मजुरांची नावे आहेत.तिन्ही महिला स्थानिक भागडी येथील केवळराम देशमुख नामक शेतकऱ्याच्या शेतात हरभरा पिकातील कचरा काढण्यासाठी गेल्या होत्या. मजुरीने शेतातील हरभरा पिकातील तण काढत असलेल्या महिलांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला चढिवला. मधमाशांनी हल्ला चढिवताच शेतातील महिलांनी स्वतःच्या बचावासाठी शेतशिवारातून पळ काढला.ही घटना शेतशिवारातील अन्य शेतकरी शेतमजुरांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती जखमी महिलांच्या कुटुंबीयांना देत तिन्ही जखमी महिलांना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
हिंदुस्थान समाचार
