नाशिक, १४ डिसेंबर (हिं.स.) : मुलाच्या नावे मंजूर झालेले कर्ज व अनुदानाची रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला लिपिकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी मुक्ताराम रतन बागूल (रा. रोहिले बुद्रुक, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांच्या मुलाच्या नावे महात्मा फुले मागास विकास महामंडळाकडून मंजूर झालेले कर्ज व अनुदानाची रक्कम मुलाच्या नावाने ट्रान्स्फर करण्यासाठी महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयातील महिला लिपिकाने दोन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या महिलेला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक जाधव करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
