cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > समृद्धी महामार्ग : 4 महिने 3 अपघात 54 ठार !
National

समृद्धी महामार्ग : 4 महिने 3 अपघात 54 ठार !

CliQ INDIA
Last updated: October 16, 2023 12:15 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

समृद्धी महामार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा

छ. संभाजीनगर, 15 ऑक्टोबर :  झटपट, सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी बनवण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर गेल्या 4 महिन्यात 3 मोठे अपघात घडले असून यात 54 लोकांचा जीव गेलाय. सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी घडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग आहे की, यमपुरीचा रस्ता अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत शेकडो अपघात होऊन अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. दररोज होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुर्घटनांसोबतच मोठे अपघात घडले आहेत. जुलै ते ऑक्टोबर 2023 या काळात या मार्गावर 3 मोठे अपघात घडले असून त्यात 54 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे आता या रस्त्याने प्रवास करायचा की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मद्यधुंद ड्रायव्हरच्या चुकीमुळे मध्यरात्री दीड बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे इथे 1 ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना देखील मध्यरात्रीच घडली होती. त्यानंतर आज, रविवारी 15 ऑक्टोबर रोजी बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या ट्रॅव्हलरला वैजापूरजवळ जांबरगाव टोलनाक्यावर झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. ते तेथून परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झालाय.

या महामार्गावर गेल्या 6 महिन्यात सुमारे एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झालेत. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडले आहेत. तसेच वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे.

You Might Also Like

केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मधील ठळक बाबी
काँग्रेससह विरोधकांना अयोध्येतून निमंत्रण
पुणे-जबलपूर उत्सव विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुधारित संरचनेसह सुरू
राजस्थान : जोधपूर-भोपाळ एक्स्प्रेसचे 2 डबे घसरले
भारतात हवाई प्रवास केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही – डॉ. जितेंद्र सिंह

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बाबा सैलानीच्या 12 भाविकांवर काळाची झडप
Next Article समृद्धी महामार्ग अपघात : पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?