अपघातामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित, गाड्या वळवल्या
कोटा, 06 जानेवारी (हिं.स.) : राजस्थानच्या कोटा जंक्शनजीक शुक्रवारी रात्री पॅसेंजर गाडीचे 2 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. पर्यायाने अनेक गाड्यांना अन्य मार्गावर वळवावे लागले. सुदैवाने या अपघातात कुठल्याही जिवीत हानीचे वृत्त नाही.
यासंदर्भात रेल्वे विभागाकडून प्राप्त आधिकारीक माहितीनुसार जोधपुर-भोपाल एक्सप्रेस ट्रेन भोपाळला जात होती. ही गाडी शुक्रवारी रात्री कोटा जंक्शनजवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला. डबे घसरल्याने प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु, कोणी गंभीर जखमी किंवा मृत नाही. ही ट्रेन शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमाराला जोधपूरहून निघाली होती. कोटाजवळ रेल्वेचे 2 डबे घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. हा अपघात कोटा जंक्शन जवळच झाल्याने रेल्वे टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच अपघातग्रस्त डब्यातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान आज, शनिवारी सकाळपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला असून जोधपूर-भोपाळ रेल्वेला रवाना करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
