सोलापूर, 24 जानेवारी, (हिं.स) – अकलूजमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवल सिंह मोहिते पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहिते पाटील यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने एक तरुण घुसला होता.
त्याला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये (Akluj Police Station) धवलसिंह मोहिते पाटलांसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अभिजित उत्तम केंगार हा 21 वर्षाचा चोरटा 18 जानेवारी रोजी पहाटे पावणेदोनच्या सुमारास हा चोरी करण्याचे उद्देशाने धवलनगर अकलुज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगाल्याचे आवारात शिरला होता. यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचे माजी चेअरमन सतिश पालकर, गिरझणी ग्रा प.चे सदस्य मयुर माने, हिरा खंडागळे व इतर चौघांनी या चोरट्याला पकडून मारहाण केली व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहे.
हिंदुस्थान समाचार
