पुणे, 24 जानेवारी, (हिं.स.) राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गतवर्षी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे पूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद केली होती. तसेच परीक्षेच्या एकूण कालावधीत दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता.
यंदाही फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावी परीक्षेत हीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी दि. २४ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. मात्र, दहावी- बारावी परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाजाचे परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे काही घटनांतून निदर्शनास आलेले आहे.
हिंदुस्थान समाचार
