सोलापूर 1 जानेवारी (हिं.स) मोहोळ तालुक्यातील पंढरपूर- कुरुल रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ जबरी चोरी झाल्याची सैफन सय्यद याने फिर्याद दिली होती. कामती पोलिसांनी ह्या तक्रारीचा योग्य मार्गाने तपास केला असता यातील फिर्यादीनेच चोरीचा बनाव करून त्याच्या मेव्हण्याच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सैफन सिकंदर सय्यद (३०) व त्याचा मेव्हणा सुलतान उमरसो मुल्ला (२५, रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर) या दोघांना कामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना मोहोळ येथील न्यायालयात उभे केले असता, दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
