अमरावती, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. त्यानुसार जिल्हाभरातील ५ लाख ३७ हजार ५९५ लाभार्थीना शंभर रुपयात शिधा किट दिली जाणार आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये शिधा किटचा पुरवठा झाला आहे. सोमवारनंतर या शिधा किटचे वितरण सुरू होणार आहे.
दरवर्षी शासनाकडून दिवाळीत आनंदाचा शिधा रेशनकार्डधारकांना दिला जातो. यंदा तो मात्र गणेशोत्सवातही देण्यात आला. आता दिवाळीचा शिधा देण्याचे नियोजन सुरू आहे.गणपतीसाठी १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लीटर खाद्यतेल या किटमध्ये देण्यात आले होते. आता दिवाळीच्या शिधामध्ये मैदा व पोहे या दोन वस्तूवाढविण्यात आल्या आहेत. परंतु त्या अर्धा किलोने कमी झाल्या आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दारिद्रयरेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळेल. जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३७ हजार
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखेडे यांनी सांगितले की, ५९५ शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, गणपतीच शिधा जनतेपर्यंत वेळेवर पोहोचल नाही. किटमध्ये काही वस्तू कर्म आल्या, अशा तक्रारी पुरवठ विभागाकडे नागरिकांनी केल्या. त्याच चौकशी करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु जिल्हा पुरवठा विभागाकडून दिवाळीआधीच आनंदाचा शिधा वाटप करण्याचे नियोजन आहे.
हिंदुस्थान समाचार
