मुंबई, 1 डिसेंबर (हिं.स.) : दि. ०२/०३-१२-२०२३ (शनिवार/रविवार) उल्हासनगर स्थानका जवळील ५७/५-६ किमीवर स्पॅन २ साठी ३ एफओबी गर्डर्स लाँच करण्यासाठी कल्याण-अंबरनाथ सेक्शनवरील अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक मध्यरात्री घेण्यात येणार आहे.
ब्लॉक तपशील:
उल्हासनगर स्टेशनच्या ५७/५-६ किमी अंतरावर स्पॅन २ साठी ३ एफओबी गर्डर्स लाँच करण्यासाठी रात्रीचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक
ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी:
दि. ०२/०३-१२-२०२३ (शनिवार/रविवार मध्यरात्री) -०१.२० वाजल्यापासून ते ३.२० वाजेपर्यंत (२ तास)
ब्लॉकचा विभाग:
डाऊन दक्षिण-पूर्व लाइन्स – कल्याण ते अंबरनाथ
अप दक्षिण-पूर्व लाइन्स – अंबरनाथ ते कल्याण (कल्याण व अंबरनाथ स्थानक वगळून)
यामुळे ट्रेन धावण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून २२.०१ आणि २२.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला येथे टर्मिनेट करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता कर्जत साठी सुटणारी लोकल ठाणे पर्यंत चालविण्यात येईल.
कर्जत येथून ०२.३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटणारी लोकल ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटेल.
ब्लॉकपूर्वीची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटेल.
खोपोली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल, खोपोली येथून २२.१५ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकनंतर कर्जत करीता पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.४७ वाजता सुटेल
कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून ०३.४० वाजता सुटेल.
ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान दक्षिण-पूर्व दिशेच्या सर्व अप आणि डॉऊन सेवा रद्द राहतील.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.
हिंदुस्थान समाचार
