cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीस आणला जाणारा ३०० किलोपेक्षा अधिक खवा जप्त
Crime

महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीस आणला जाणारा ३०० किलोपेक्षा अधिक खवा जप्त

CliQ INDIA
Last updated: November 5, 2023 3:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळीनिमित्त राजस्थान व गुजरात या भागातून अवैधरित्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला जात असलेला खवा मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीनं अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतला आहे. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी मधल्या दापचरी इथं सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री खवा वाहतूक करणारी एक खाजगी ट्रॅव्हल बस अडवून मनसे कार्यकर्त्यांनी हा खवा अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला. दरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी कारवाई बाबत समाधान व्यक्त करून आपल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

गुजरात आणि राज्यस्थान मधून हा खवा मुंबई , पुणे , ठाणे या शहरांमध्ये लक्झरी बस मधून हा अवैध रित्या वाहतूक केला जात होता. या कारवाईत ३०० किलो पेक्षा अधिक खवा ताब्यात घेण्यात आला असून अन्न आणि औषध प्रशासनासह पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

सध्या सणासुदीचे दिवस असून या काळात विविध प्रकारच्या मिठाई मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. दिवाळी मध्ये तर विविध प्रकारच्या मिठायांची मागणी मोठी असते. अशा वेळी वेगवेगळया मिठाई बनवण्यासाठी खव्याची गरज असते. त्यामुळे बेसळ युक्त खवा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याच्या घटना समोर येतात. या काळात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या इतर ठिकाणाहून खव्याची विक्री केली जात असल्याच्या बाबी सुद्धा समोर येत असतात. त्यामुळे आपण घेत असलेली मिठाई उत्तम प्रतीच्या खव्या पासून तयार केली गेली आहे का याची देखील एकडा तपासणी करायला हवी. आपण जी मिठाई खात आहोत ती आपल्या शरीरासाठी हानीकारक तर नाही ना ? या कड़े ही लक्ष द्यायला हवं.

सणासुदीच्या दिवसामध्ये अन्नपदार्थामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे जनतेने सुध्दा या काळात अन्नपदार्थ खरेदी करतांना सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यांच्या निर्देशनानुसार

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा धडका सुरू केला आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

अमरावती : मंगळसूत्र पळवणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात | BulletsIn
रत्नागिरी : सोशल मीडियावर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट
लातूर – चोरीचा गुन्हा उघड; एक आरोपी अटकेत
गणेशोत्सवाला गालबोट – पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या
मंडळाधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ओएनजीसीसारखे उपक्रम ईशान्येकडील जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध : हरदीप पुरी
Next Article अमरावती : ‘आनंदाचा शिधा’ चे सोमवारपासून वितरण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?