चंद्रपूर 17 ऑक्टोबर : नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय अजिंक्य ठरले आहे.गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत मागील दहा वर्षापासून सरदार पटेल महाविद्यालयाचा संघ अजिंक्यपद पटकवित आहे. ती परंपरा महाविद्यालयाने यंदाही कायम ठेवली.
नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालयात आयोजित या विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला. या बुद्धिबळ स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजयश्री खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात कु. निर्मला वर्मा, कु. श्रुती पवार, कु. प्रिन्सेस दासरी, कु. प्रीती यादव यांनी आपल्या सुरेख खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, आ. किशोर जोरगेवार, संदीप गड्डमवार, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, सुधाकर पोटदुखे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ. नागशेन मेश्राम, प्रभारी प्रबंधक श्री विनोद चोपावार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुवर, डॉ. कुलदीप आर. गोंड, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संघाच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
