सोलापूर, 6 ऑक्टोबर, ( हिं.स) सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या बहुतांश रुग्णांची हेळसांड होत असल्याचे खरेखुरे चित्र आहे.मर्जीमधील तसेच वशिलेबहाद्दरवाल्यांनाच येथे सगळे उपचार लवकर मिळतात. शिवाय येथील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, मदतनीस, स्वच्छता कामगार आदी सर्वांचीच अरेरावी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहन करावी लागते.खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्याची कुवत नाही आणि दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयात मोफत उपचार करून घेताना ही अडचण. शिवाय अरेरावी. एकूणच तोंड दाबून बुक्यांचा मार असाच प्रकार सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्याबाबतीत असल्याचे सर्वोपचार रुग्णालयात केलेल्या सर्व्हेतून आढळून आले.
हिंदुस्थान समाचार
