सोलापूर, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। पिलीव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस कमिटीचे वतनदार किशोर जावळे व कांचन जावळे यांच्या हस्ते सपत्नीक विधिपूर्वक महाअभिषेक घालून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.
यात्रा निर्वीघ्नपणे पार पाडून भावीक भक्तांची यात्रा सुखकर व्हावी. नागरिकांना सुख शांती, प्रपंचात बरकत व्हावी. सौख्य लाभावे. दुष्काळ नष्ट व्हावा, भरपूर प्रमाणात पाऊस पडावा म्हणून श्री महालक्ष्मीला साकडं घालण्यात आले.दरम्यान, श्री महालक्ष्मी देवीच्या सजवलेल्या पालखीची पिलीव पेठेतून वाजत गाजत, पोतराजी नृत्य, देवीची गाणी म्हणत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मानकरी परिट समाजाच्यावतीने देवीच्या पालखी समोर कापडाच्या पायघड्या घातल्या. तर मानकरी कपने, मदने, मेटकरी, सोलंकर यांनी ढोलताशांच्या वाद्याच्या गजरात मानाच्या काट्या मिरवणुकीत घेऊन सहभागी झाले होते.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
