सोलापूर 16 ऑक्टोबर (हिं.स.) : द्राक्षाचे भाव गडगडल्या मुळे त्यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार केला .त्यामुळे बेदाण्याचे दर काेसळले.सध्या गगनाला गेलेले टॉमेटोचे दर ही कोसळले असुन दुध उत्पादक ही दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत.या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी देशांचे माजी कृषिमंत्री शरद पवार २३ ऑक्टोबर, सोमवार रोजी सकाळी दाहा वाजता कापसेवाडी येथे येणार आहेत, अशी माहिती कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी दिली.यावेळी योगेश जाधव, हनुमंत खताळ व कृषीनिष्ट परिवाराचे सदस्य उपस्थित होते .
मागील वर्षी पावसाळा हंगाम चांगला असल्यामुळे अनेक ठिकाणी द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. परिणामी द्राक्षाला पंधरा ते विस रुपये किलो दर इथपर्यंत निचांकी दर मिळाला बेदाणा तयार केले त्याचे दर गडगडले आहेत.बेदाण्याला 50 रुपये अनुदानाची मागणी होत आहे.
हिंदुस्थान समाचार
