गोंदिया १७ ऑक्टोंबर (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यात नवीन अटी-शर्तींमुळे धान खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात धान विकावे लागत असून चिंतेत वाढ झालीय.
शासनाने यंदा धान खरेदीचे नवीन निकष लावल्याने सेवा सहकारी संस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. नवीन अटी,शर्ती रद्द करण्याची मागणी केली जात असल्यामुळे यंदा दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. कारण आतापर्यत फक्त अ वर्गाच्या 34 धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात धान विकण्याची पाळी येणार असून शेतकऱ्यांचे सण उत्सव संकटात सापडण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
