सोलापूर 17 ऑक्टोबर ( हिं.स) : न. ए. बी सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर शाळेतील अंध विद्यार्थांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या वतीने ब्रेलर मशीन भेट देण्यात आले. चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शासनाच्या एकात्मिक शिक्षण योजने अंर्तगत ६ वी ते १२ पर्यंत एकूण ४० अंध विद्यार्थी डोळस विद्यार्थांसोबत शिक्षण घेत आहेत.
शाळेस ब्रेलर मशीनची आवश्यक्यता होती. शाळेचे मुख्याध्यापक नृसिंह असादेसर यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि चे संचालक डी राम रेड्डी व श्री राजेश्वर रेडडी यांचे कडे मागणी केली. बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीने आज होटगी रोड येथिल कार्यालयात संचालक डी. राम रेड्डी व एन. राजेश्वर रेड्डी यांच्याहस्ते शाळेचे मुख्याध्यापक असादे व पवार यांचे कडे ब्रेलर मशीन सुपूर्त करण्यात झाला.
या कार्यक्रमास श्री मल्लिनाथ बिराजदार प्रशालेचे वल्लकाटी सर पवार मॅडम शाळेतील विद्यार्थी तसेच दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते. या प्रसंगी मुख्याध्यापक असादेसरांनी ब्रेलर मशीन दिल्या बद्दल बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या संचालक डी. राम रेडडी व एन. राजेश्वर रेड्डी यांचे तसेच सर्व संचालकांचे आभार मानले. तसेच ब्रेलर मशीनमुळे प्रशालेतील अंध विद्यार्थीना या लाभ होणार आहे. विद्यार्थी ”ना ब्रेल लिहण्यास व ब्रेल वाचण्यास त्रास होणार नाही. ब्रेलकिट स्लेटवर लिहीत असताना कागद सेट करताना अंध विद्यार्थांना त्रास होत होता. तो कागद व्यवस्थित बसत नसल्यामुळे ब्रेल वाचताना खुप अडचणीचे होत होते. बेलर मशीनमुळे हा सर्व त्रास आता होणार नाही, असे सांगितले.
बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि . चे संचालक राम रेड्डी यांनी ब्रेलर मशीनचा वापर करून प्रशालेतील विदयार्थी भविष्यात चांगले अधिकारी व्हावेत हीच आमची प्रार्थना आहे असे विचार व्यक्त केले. तसेच त्याच्या पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार
