लासलगाव, ६ ऑक्टोबर, (हिं.स) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयुष्यमान भव ही महत्वकांक्षी आरोग्य विषयक मोहीम दि १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत राबिविली जाणार आहे.या मोहिमेचा उद्देश हा गाव पटलीपर्यंत गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा व सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हा आहे.
त्या अनुषंगाने दिनांक ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथील विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहे यामध्ये स्त्रीरोग,बालरोग,भुलतज्ञ,नेत्र चिकित्सा,कान नाक घसा,त्वचा,मानसिक आरोग्य,असंसर्गजन्य आजार,दंतचिकित्सा इत्यादी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.परिसरातील नागरिकांनी या आरोग्य मेळाव्यास हजर राहून आपल्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे व या आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन लासलगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बाळकृष्ण अहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील,डॉ नीलकंठ भामरे,डॉ पल्लवी गोरडे,श्रीमती घुसले,पठाण,वाडीतके,गणेश भवर व इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन या आरोग्य मेळाव्याचे नियोजन केले आहे.या आरोग्य मेळाव्यात येण्यासाठी नागरिकांना कोटमगाव फाटा,रेल्वे स्थानक,बस स्थानक लासलगाव येथे रुग्णवाहिका सुविधा देऊन रुग्णालयापर्यंत रुग्णांना पोहचविण्यासाठी मदत केली जाणार असून नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी वर्गाने केले आहे.
हिंदुस्थान समाचार
