सोलापूर, 6 ऑक्टोबर, ( हिं.स) – सोलापूर शहरातील सर्वात मोठी पोलीस वसाहत म्हणून ओळख असलेल्या अरविंद धाम पोलीस वसाहतीत एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतला. या घटनेने पोलिस वसाहतीत खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलाने अरविंद धाम पोलिस वसाहतीत अज्ञात कारणाने गळफास घेतल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. त्याने राहत्या घरी दुपारी अडीचच्या सुमारास सिलिंग फॅनला कपड्याच्या साहाय्याने गळफास घेतला होता. नातेवाईकांना ही बाब समजताच ताबडतोब खाली उतरवून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. यावेळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.
हिंदुस्थान समाचार
