ठाणे, १ नोव्हेंबर, (हिं. स) : लोकायन आयएएस अकॅडमीच्या वतीने ठाण्यात `यूपीएससी/एमपीएससी” या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास कसा करावा या विषयावर विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता लोकायन आयएएस अॅकॅडमी, तिसरा मजला, 304, बाल गणेश टॉवर, दादा पाटील वाडी, ठाणे रेल्वे स्थानक, फलाट क्र. 1 च्या बाजूला, ठाणे येथे होणाऱया या शिबिरात भूषण देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी 8928627612 अथवा 9004804366 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
