पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) अभ्यासक्रमातून काढल्याच्या रागातून एका विद्यार्थ्याने इन्स्टिट्यूट चालकास चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना डेक्कन परिसरात घडली. या हल्ल्यात संकल्प योगेश जांदे (२३, कात्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ऋषिकेश अशोक नाडे (रा. डेक्कन कॉर्नर) या तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगली महाराज रस्त्यावरील कर्णिक प्लाझा इमारतीमध्ये आयटी प्रिन्यूअर नावाचे इन्स्टिट्यूट आहे.या इन्स्टिट्यूटमध्ये आयटीचे अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यार्थ्याची वर्तणूक चांगली नसल्यामुळे जांबे यांनी त्याला अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा इ-मेल केला होता. त्याचा राग मनात धरून या विद्यार्थ्याने अभ्यासक्रमास प्रवेश द्या, नाहीतर जीवे मारतो, अशी धमकी देत जांबे यांच्या पोटात चाकूने वार केला.
हिंदुस्थान समाचार
