नाशिक, ०९ फेब्रुवारी : नाशिकमध्ये भाजपा ओबीसी मोर्चाकडून आज, शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. पंतप्रधानांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
राहुल गांधी यांनी याविषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख करत भारत जोडो न्याय यात्रेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या जाती बद्दल चुकिची माहिती पसरवली ते खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांचा ओबीसी प्रवर्गासी काहीही संबंध नाही. मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाही त्यांचा जन्म गुजरातच्या तेली जातीत झाला आहे अशी माहिती यांनी ओडीसा येथील झरसुगुडा येथे दिली. या जातीला ओबीसी भाजपाने 2000साली ओबीसी प्रवर्गात टाकली त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती असे वक्तव्य केल्याने भाजपा ओबीसी मोर्चा नाशिक महानगराच्यावतीने रविवार कारंजा येथे राहुल गांधी यांच्या पुतळयाचे दहन करून निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, अमित घुगे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अजय आघाव, सुषमा गोराणे, राजेंद्र मोरे, मच्छिंद्र सानप, कैलास पाटील, सागर शेलार, सोनाली ठाकरे, सोनाली राजे पवार, मिनल भोसले, सुजाता करजगीकर, अलका जांभेकर, सोनल दगडे, रिटा सोनी, वसंत उशीर, अनिता भामरे, रतन काळे, दशरथ लोखंडे, राजेंद्र कोरडे, कैलास पाटील, तेजश्री काठे, तानाजी अष्टेकर, सचिन मोरे, प्रशांत वाघ, पवन उगले, ऋषिकेश शिरसाठ, शरद काळे, शरद जाधव, दिपक पाटील, करूना गायकवाड, विजय गायखे, विक्रांत गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, ऋषिकेश डापसे, भाविक तोरवणे, संदिप शिरोळे, ज्योती कवर, योगीता अमृतकर, मुफद्दल पेंटर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
