मुंबई, ३१ डिसेंबर (हिं.स.) : मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याचे सांगत एका कॉलरने केला. एवढे एकच वाक्य बोलून कॉलरने लगेचच फोन कट केला. सदर कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. प्राथमिक तपासात फोन जे बी नगर एअरपोर्ट रेसिडन्सी कॉम्पलेक्समधून फोनचे लोकेशन समजले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप काही संशयास्पद सापडलेले नाही.
हिंदुस्थान समाचार
