महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषी महाराज यांचे प्रतिपादन
अहमदनगर, 30 ऑक्टोबर(हिं.स.): उद्योग व्यवसाय करताना उत्कर्ष साधायचा असेल तर सचोटी व प्रामाणिकपणा महत्वाचा आहे.या बरोबरच धर्माचरण करून संस्कारित होणेही आवश्यक आहे.साजन सजनीचे भंडारी परिवाराने व्यवसाय व धर्मप्रेम या दोन्ही गोष्टींची उत्तम सांगड घालत आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळेच या परिवाराची खरीखुरी भरभराट होऊन समृध्दी प्राप्त झाली आहे.ग्राहकांप्रमाणेच मानवसेवेलाही प्राधान्य देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन केले.आचार्य सम्राट प.पू.आनंदऋषी महाराज यांचे सुशिष्य महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषी महाराज यांनी केले. नवीपेठ येथील साजन सजनी वस्त्र दालनाला कोजागिरी पौर्णिमेला ३२ वर्षे पूर्ण झाली.यानिमित्त कुंदनऋषी महाराज यांनी नवकार महामंत्र जाप करून आशीर्वाद दिले.
हिंदुस्थान समाचार
