मुंबई, ७ जानेवारी, (हिं. स) वाटूळ येथील सोनारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ शिवसेना उपनेते ( उबाठा ) आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2022-2023 द्वारे निधी प्राप्त झाला असून लवकरच या कामाची पूर्तता करण्यात येईल.
या भूमिपूजन सोहळ्यास विभागप्रमुख वसंत जड्यार, उपविभागप्रमुख नागेश बने , माजी सभापती सुभाष गुरव, शाखाप्रमुख राहुल चव्हाण, बूथप्रमुख कृष्णा चव्हाण, शिवसेना महिला संघटक वर्षा कृष्णा चव्हाण, वाटूळ गावच्या सरपंच श्रीमती नीता चव्हाण, माजी सरपंच, शाखाप्रमुख अभय चव्हाण, संतोष भुर्के, माजी सरपंच नारायण चव्हाण, माजी उपसरपंच संजय चव्हाण, विजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चव्हाण, ओमकार चव्हाण,प्रियांका भुर्के,कविता चव्हाण , शिवसैनिक राजेश चव्हाण, भानू नारकर, विष्णू घाटकर, संदीप भुर्के, विजय कातकर, सिद्धेश घाटकर, रामचंद्र इंदुलकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
