मुंबई, 2 डिसेंबर (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी मध्य रेल्वे दि. ५/६.१२.२०२३ च्या मध्यरात्री (मंगळवार-बुधवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
तपशील खालीलप्रमाणे-
मेन लाइन- अप विशेष:- परळ -कल्याण विभाग:
कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.
कल्याण-परळ विशेष कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे २.१५ वाजता पोहोचेल.
ठाणे-परळ विशेष ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.
मेन लाइन – डाऊन विशेष:- कल्याण – परळ विभाग:
परळ-ठाणे विशेष परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण विशेष परळ येथून ०२.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल.
परळ-कुर्ला विशेष परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – अप विशेष:- पनवेल – कुर्ला विभाग:
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन – डाऊन विशेष – कुर्ला – पनवेल विभाग:
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.
कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सुविधेचा लाभ घ्यावा.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार
